SANSKAR . MEDITATION . RESPECT . INTEGRITY.

पाश्चात्य संस्कृतीकडे असणारा मुलांचा ओढा पहाता, भारतीय संस्कृतीनुसार मुलांवर संस्कार करूया..

The purpose of Balsanskar is to encourage & nurture child’s own inherent talents, help them understanding right form of culture & making them strong on handling emotion, provide them direction on ethics 

‪+1 ‪(571) 307-5561‬‬

+91 94031 95118

To know more about Bal Sanskar Varg and its learning, Join free one hour parent seminar

We would strongly encourage parents to become a part of this journey! 

Saturday September 5th, 2023 10:00 – 11am EST, 7:00 – 8:00 PST
About us

बालसंस्कार वर्ग का?

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी जागतिक दर्जाचे शैक्षणिक शिक्षण घेत असताना आपली मुले नैतिक आणि सांस्कृतिक मूल्ये शिकण्यात कुठेतरी कमी पडत आहेत याचा आपण पालक म्हणून नक्कीच विचार करायला हवा. खरंतर संस्कार म्हणजे फक्त आरती, मंत्र, स्तोत्र हेच आहे का? तर नाही.  कारण काळ बदलला आणि काळाबरोबर संस्काराची परिभाषा देखील बदलली. आजची लहान मुले म्हणजे उद्याची युवा पिढी ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याकडे वेगाने वळताना आपण पाहतोय. भविष्यात याचे गंभीर परिणाम त्यांना आणि अर्थातच आपल्याला भोगावे लागू नयेत यासाठी संस्कारवर्गाच्या माध्यमातून मुलांचा पाया भक्कम करणे अतिशय गरजेचे आहे.

आजकाल मुलांचा सुरु असलेला मोबाईलचा अतिवापर, तासंतास ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या गेम्स, सतत टीव्ही बघण्याचे लागलेले व्यसन, सात्विक आणि पौष्टिक आहाराची टाळाटाळ, मैदानी खेळ किंवा व्यायामाचा अभाव/कंटाळा, आई-वडील आणि वडिलधाऱ्या मंडळींसोबत अयोग्य आचरण आणि त्यांना दिली जाणारी उलट उत्तरे अश्या एक ना अनेक समस्या आणि याचे त्यांच्या वाढत्या वयावर होणारे दूरगामी परिणाम किती भयानक आहेत हेही आपल्याला माहिती आहे, पण बऱ्याच वेळा यात सुधारणा करण्यात एक पालक म्हणून आपल्याला बऱ्याच अडचणी येतात कारण मुले ऐकत नाहीत किंवा आपल्याला वेळ नसतो. 

या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि मुलांना ऐश्वर्य, भौतिक सुख, व्यसनाधीनता आणि इतर अनेक वाईट सवयी या सगळ्यापासून परावृत्त करण्यासाठी “साई आर्या बालसंस्कार वर्ग” वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. बालसंस्कार वर्गाचा एक भाग म्हणून, तुमचे मूल पौराणिक, ऐतिहासिक कथांबद्दल शिकेल आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांचा मूळ सांस्कृतिक वारसा जाणून घेईल. 

बाल संस्कार वर्गात संवादात्मक चर्चासत्रे, मंत्र आणि प्रार्थना, सूर्यनमस्कार, योग/प्राणायाम, ध्यान, कला आणि हस्तकला, मजेदार कलाकृती आणि बोध कथा (कथा सांगणे) अश्या विविध उपक्रमांद्वारे मुलांना मूलभूत मूल्ये आणि जीवन कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जातो. भारतीय चालीरीती, पारंपरिक सण आणि अनेक  प्रेरणादायी व्यक्तिमत्वे याबद्दल माहिती दिली जाते. थोडक्यात या चिमुकल्यांना उद्याचा फक्त सुशिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा  “साई आर्या बालसंस्कार वर्ग” चा मूळ उद्देश आहे. त्यांच्यात आदर, प्रेम, माणुसकी, आपुलकीची भावना रुजवली जात आहे. अगदी लहानग्यांपासून ते १३ वर्षाच्या मुलांना या संस्कार केंद्रामध्ये सुसंस्काराचे धडे देऊन नैतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध व्यक्ती बनवण्याचा आमचा मानस आहे. उद्याच्या सुजाण, सुसंस्कृत नागरिकत्वाची जडणघडण होण्यास याची नक्कीच मदत होणार आहे.

या स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठण्यासाठी योग्य संस्काराची शिदोरी देऊन बालवयातच मुलांची मानसिक तयारी येथे केली जात आहे. तुमच्या मुलांना आनंदी जीवन जगण्याचा हा मंत्र नक्कीच मदत करेल याची आम्हाला खात्री आहे. 

 

बालसंस्कार वर्गामध्ये मुलांना काय मिळणार??

 

नेहमीच मुलांना अतिशय चांगल्या सवयी लागणारा बालसंस्कार वर्ग. ज्यामध्ये मुले रोज सूर्यनमस्कार करतात.

  • प्राणायाम, ॐकार,
  • ध्यान (मेडिटेशन) ज्याची मुलांना आजच्या जीवनात अत्यंत गरज आहे..
  • स्तोत्र
  • मंत्र
  • श्लोक
  • मुलांच्या मोबाईल वापराचे प्रमाण कमी होते.
  • टीव्ही बघण्याचे प्रमाण कमी होते
  • भारतीय पद्धतीने जेवणाचे महत्व समजते.
  • सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांचं आचरण कसं असावं हे सांगितलं जात.
  • चित्रकला
  • क्राफ्ट
  • बोधकथा, गोष्टी
  • आई वडिलांबरोबरचे मुलांचे नाते सुधारते.

या सर्व गोष्टी अत्यंत नाममात्र फी मध्ये आम्ही मुलांसाठी करतोय, कारण जास्तीत जास्त मुले ही भारतीय संस्कार घेऊन त्यांनी जीवनाची वाटचाल सुखमय करावी. लक्षात ठेवा पैसा सगळे कमवू शकतात पन संस्कार हे पैसे खर्च करून विकत घेता येत नाहीत जेव्हा मुले मोठी होतात, आत्ताच वेळ आहे त्यांना संस्कार देण्याची.

आपण अगदी सहज आपल्या लाडक्या मुलांना गरज नसताना आणि उपयोग नसलेले पिझ्झा, बर्गर, महागडी खेळणी आणि अश्या बऱ्याच गोष्टी देतो, मग मुलांचे आयुष्य घडवणारे संस्कार का देऊ नये, तेही अतिशय अतिशय कमी फी मध्ये, नक्की यावरती विचार करा आणि आजच रेजिस्ट्रेशन करा.

 

WHAT PARENT SAY